Ad will apear here
Next
‘रेरा’मधील नवीन तरतुदी स्पष्ट कराव्यात : ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ची मागणी
पुणे : महाराष्ट्रात रेरा कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी ज्या गृहप्रकल्पांना पूर्णत्त्वाचा दाखला किंवा भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त झाले आहे, त्यांची रेरा कायद्याअंतर्गत नोंदणी करणे आतापर्यंत आवश्यक नव्हते; मात्र महसूल विभागाने नुकत्याच जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार ही नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. दिवाळी तोंडावर आली असताना काढण्यात आलेल्या या नव्या परिपत्रकामुळे घरांची खरेदी-विक्री अडचणीत आली असून, मुहूर्त साधून सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे.

त्यामुळे ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ने राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे आणि महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांना पत्र पाठवून या तरतुदींबद्दल स्पष्टता आणली जावी, अशी विनंती केली आहे.

‘रेरा कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी पूर्णत्त्वाचा दाखला वा भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या प्रकल्पांना आता विक्री करार नोंदणी करायची असेल, तरीही मूळ प्रकल्पाची तेव्हाच्या परिस्थितीनुसार रेरा नोंदणी नसल्यामुळे या सदनिकांच्या विक्री व्यवहारांना खीळ बसली आहे. हीच समस्या रेरा येण्यापूर्वीच्या भूखंड विकसन प्रकल्पांच्या बाबतीतही उद्भवली आहे. याबरोबरच रेरा कायद्यानुसार ज्या गृहप्रकल्पांचे क्षेत्रफळ ५०० चौरस मीटरपेक्षा कमी आहे, तसेच गृहप्रकल्पात आठपेक्षा कमी सदनिका आहेत, त्यांच्यासाठी अद्याप रेरा नोंदणी गरजेची नव्हती. ती आता अनिवार्य झाली आहे. याशिवाय सदनिका व भूखंडांच्या पुर्नविक्रीत विकसक हा कागदोपत्री भागीदार नसेल, तर त्याला नोंदणी अनिवार्य नसावी,’ असे क्रेडाई पुणे मेट्रोने म्हटले आहे.  

‘महसूल विभागाच्या नवीन परिपत्रकामुळे सदनिकांच्या विक्री व्यवहारांत संदिग्धता निर्माण झाली असून, त्यामुळे विकसक आणि ग्राहक या दोघांनाही समस्या भेडसावत आहेत, त्यामुळे या परिपत्रकाबाबत लवकरात लवकर स्पष्टता आणली जावी,’ अशी विनंती क्रेडाई पुणे मेट्रोने पत्राद्वारे केली आहे.

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट म्हणाले, ‘अनधिकृत बांधकामांना आळा घालणे आवश्यक असून, त्यासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांना आमचा पाठिंबाच आहे; परंतु या परिपत्रकामुळे ऐेन सणासुदीच्या काळात सदनिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारांना फटका बसत आहे. प्रामाणिक विकसक आणि ग्राहक यात भरडले जात असल्यामुळे या तरतुदींचा पुर्नविचार होणे आवश्यक आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZXSCF
Similar Posts
बांधकाम कामगारांना मिळणार पाच रुपयांत जेवण पुणे : दिवसभर अंगमेहनतीचे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना आता कामाच्या ठिकाणी केवळ पाच रुपयांत दुपारचे जेवण उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दररोज स्वच्छ आणि गरम जेवण मिळावे यासाठी सरकारने सुरू केलेल्या ‘अटल आहार योजने’चा क्रेडाई पुणे मेट्रोच्या सहकार्याने पुण्यात प्रारंभ करण्यात आला.
‘उद्योगांनी अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून घेणे आवश्यक’ पुणे : ‘अत्यंत अद्ययावत असे ‘इंडस्ट्री फोर पाँईंट झीरो’ तंत्रज्ञान, ‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’, ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि ‘मशीन लर्निंग’ हे आजच्या जगातील परवलीचे शब्द झाले आहेत. उद्योग क्षेत्रातील ही आव्हाने असून, लवकरात लवकर त्यांचा सामना करून नवे तंत्रज्ञान अवगत करून
‘महारेरा’साठी विकसकाची मान्यताप्राप्त संस्थेकडे नोंदणी आवश्यक पुणे : ‘प्रत्येक बांधकाम किंवा गृहप्रकल्पाची ‘महारेरा’ नोंदणी करण्यापूर्वी विकसकाला आता ‘क्रेडाई’सारख्या कोणत्याही मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थेकडे नोंदणी करणे बंधनकारक केले जाणार आहे. बांधकाम क्षेत्रात अधिक शिस्त आणण्याच्या हेतूने व ‘महारेरा’च्या नियमांची अधिक चांगल्याप्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी
महिला कामगार करणार गवंडीकामही; प्रशिक्षणाने दिला आत्मविश्वास पुणे : इमारत बांधकामाच्या ठिकाणी महिला प्रामुख्याने दिसतात त्या ओझी वाहण्याचे काम करताना; पण पुण्यातील काही इमारतींच्या बांधकामाच्या ठिकाणी आता महिला कामगार गवंडीकाम करतानाही दिसणार आहेत. ‘क्रेडाई’तर्फे काही महिलांना त्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, कौशल्यवृद्धीमुळे या कामगारांना कामाचा अधिक मोबदला मिळणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language